डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात महिलेच्या उजव्या खुब्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मागील ५ ते ६ वर्षांपासून संधीवाताच्या समस्येने त्रस्त असलेली महिला ५ महिन्यांपासून पलंगावर खिळून होती, अशा रुग्णाची जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. दिपक अग्रवाल यांनी उजव्या खुब्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिला आता चालायला लागल्याने कुटूबियांनी डॉक्टरांचे आभार मानले.

 

मुक्‍ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा येथील उषाबाई भास्कर हिरोळे (वय ४७)ह्या गेल्या पाच महिन्यांपासून पलंगावर खिळून होत्या. संधीवातामुळे त्यांना हात-पाय तसेच जॉईंट्समध्ये तीव्र वेदना होत होत्या. मात्र जेव्हा दुखणे वाढले त्यावेळपासून रुग्ण महिलेचे चालणेही बंद झाले. त्यांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात जाण्याचा योग्य देण्यात आला. येथे आल्यावर डॉ.दिपक अग्रवाल यांनी रुग्णाच्या विविध तपासण्या करून तात्काळ टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करावी लागणार असा सल्‍ला देवून शस्त्रक्रिया केली. त्यांना रेसिडेंट डॉ.सुनिल वेलणकर, डॉ. परिक्षीत पाटील, भुलतज्ञ डॉ. देवेंद्र चौधरी यांचे सहकार्य लाभले. उजव्या खुब्याच्या शस्त्रक्रियेनंतर लगेचच डाव्या बाजूला एव्हीएल अर्थात एव्हस्कुलर नेक्रोसिस करण्यात आले, एकाच दिवशी ह्या दोन्ही शस्त्रक्रिया झाल्या, तीन आठवड्यानंतर रुग्ण आपल्या पायांवर चालायला लागली.

जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ.दिपक अग्रवाल यांनी यावेळी सांगितले की, हाडे, मणके असो वा खुब्याची दुखणे यावर तात्पुरता औषधोपचार घेऊन उपयोग होत नाही. अशा दुखण्यांसाठी स्पेशालिस्ट डॉक्टरकडून रुग्णांनी तपासणी करुन घ्यायला हवी. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया येथे उपलब्ध असतात, त्यामुळे आजच आपली जुनाट वा नविन दुखणी घेऊन रुग्णालयात यावे आणि निश्चिंत व्हावे, असे मी आवाहन करतो.

रुग्णाचा मुलगा विक्‍की हिरोळे याने आपली भावना व्यक्त करतांना सांगितले की , माझी आई शेतीकाम करायची मात्र संधीवाताचा त्रास सुरु झाला आणि ती आता घरीच असते, मात्र मागील पाच महिन्यात दुखणे इतके वेगाने वाढले की आता ती कधीच चालू शकणार नाही असे मला वाटले मात्र मलकापूर येथील डॉ.चोपडे यांनी आम्हाला येथे जा असे सांगितले आणि खरोखरच येथे झालेल्या शस्त्रक्रिया आणि डॉक्टरांच्या वेळोवेळी मार्गदर्शनसोबतच प्रोत्साहनाने आई चालायला लागली, त्याबद्दल मी रुग्णालयाचे आभार मानतो.

Protected Content