डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात हाडांचा ठिसूळपणा तपासणी मोफत शिबीर

जळगाव, प्रतिनिधी | जागतिक अस्थिसुषिरता अर्थातच ऑस्टिपोरोसिस दिनानिमित्त गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिराचे आयोजन  उद्या २० ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

 

वाढत्या वयोमानानुसार शरिरातील हाडांची झीज होत असते. परिणामी हाडांमध्ये वेदना होणे, हि समस्या निर्माण होते. यासाठी २१ ऑक्टोबर या जागतिक अस्थिसुषिरता अर्थातच ऑस्टिपोरोसिस दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार, २० ऑक्टोबर रोजी मोफत हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. डेक्सा स्कॅन मशीनद्वारे अवघ्या १०-१५ मिनिटात तपासणी करण्यात येऊन तासाभरातच रिपोर्ट देण्यात येणार आहे. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबीर आज होत आहे. त्याकरिता दिल्ली येथील डेक्सा स्कॅन अर्थातच ड्युएल एनर्जी एक्सरे अ‍ॅब्सॉर्प्शीओमेट्री मशीन सह तंत्रज्ञ येणार आहेत. याशिवाय रुग्णालयात अस्थिरोतज्ञ डॉ. प्रमोद सर्कलवाड, डॉ. दीपक अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करणार असून त्यांना डॉ.परीक्षित, डॉ.सुनीत, डॉ.राहुल ह्यांचे सहकार्य लाभणार आहे. ३५ वर्षांवरील स्त्री – पुरुष रुग्णांसाठी हे शिबीर घेण्यात येणार असून सकाळी १० ते ५ या वेळेत रुग्णालयात येवून हाडांच्या ठिसुळपणा तपासणी शिबिरचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

Protected Content