डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयात ‘ऑस्टिओपोरोसिस’ दिवस साजरा 

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी अर्थात भौतिकोपचार महाविद्यालयात गुरुवार, २० ऑक्टोबर रोजी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, डॉ.मुकेश शिंदे, डॉ.प्रिती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.सुस्मिता सपकाळ, डॉ.मानसी सारोळकर, डॉ.निकीतेश श्रीपाद, डॉ.रिद्धी गौर, डॉ.साक्षी उत्‍तमचंदानी, डॉ.यशश्री साळवे, डॉ.अनघा सांगवई यांनी महत्वपूर्ण माहिती देवून आजाराबद्दल जागरुकता निर्माण केली. यावेळी ब्रह्मदत्‍त घाटे यांच्यासह उपस्थीत श्रोत्यांनी आपल्या शंकाचे निरसन करुन घेतले.

Protected Content