डॉ . आर . एस . माळी यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार

 

 

जळगाव : प्रतिनिधी । तत्कालीन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू व पुण्यातील रहिवाशी डॉ . आर . एस . माळी यांना सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठाने यंदाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार देऊन गौरव केला आहे .

 

सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा . नितीन  करमळकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठाकडून  दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो यंदाचा हा पुरस्कार डॉ . आर . एस . माळी यांना त्यांनी उच्च शिक्षण आणि शैक्षणिक प्रशासन या क्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कामगिरीची दाखल घेऊन देण्यात आला आहे .

 

आज सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वार्षिक सोहळ्यात डॉ . आर . एस . माळी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .

Protected Content