जळगाव, प्रतिनिधी | डॉ .अविनाश आचार्य विद्यालयात आज शनिवार १ फेब्रुवारी रोजी डॉक्टर विद्यार्थ्यांच्या भेटीला हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील दंत चिकित्सक डॉ. तेजस रावेरकर यांनी इ ३ री व ४ च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मुलांना अभ्यासक्रमात शरीराचे अवयव ,त्यांचे कार्य ,पचनसंस्था इ घटक आहेत.त्या अनुषंगाने डॉ.तेजस रावेरकर यांनी मुलांना सविस्तर माहिती दिली. दातांची काळजी कशी घ्यावी, योग्य प्रकारे दात कसे घासावे, शरीराची निगा कशी राखावी आदी विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. शरीर स्वच्छ कसे ठेवावे, योग्य आहार कसा असावा याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी उपस्थित होत्या. आरोग्याच्या संबधित अनेक प्रश्न मुलांनी या वेळी विचारले.