जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । एस. एस. मणियार विधी महाविद्यालय आयोजित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे स्मृती १६ व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के.सी. संत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. एम. क्यू. एस. एम. शेख यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. यावेळी मंचावर केसीई सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रमोद एन. पाटील, जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. केतन ढाके, जळगावचे वरिष्ठ वकील ॲड. सुशील अत्रे, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश बी पाटील यांनी भुषविले.
कार्यक्रमास जालना जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष नीलिमा संत, केसीई सोसायटीचे सचिव ॲड.एस. एस. फालक, जळगावचे जिल्हा सरकारी वकील ॲड. एस. जी. काबरा जिल्हा न्यायालयीन अधिकारी सापतनेकर, वावरे, एस. आर. पवार, एस.एन. माणे, डी.वाय. काळे, व्ही.व्ही. मुगलीकर, एस.पी. सय्यद, जे.जी. पवार, सोनवणे, केळकर, कोलते, जिल्हा बारचे सन्माननीय वकील ॲड. महेश भोकरीकर, रवी पाटील, सागर चित्रे, रूपाली भोकरीकर, सुरज जहांगीर, सत्यजित पाटील, अतुल सूर्यवंशी, सौरभ मुंदडा, समन्वयक डॉ. विजेता सिंग, डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहुजा, प्रा. विनोद पाटील, प्रा. जी. व्ही. धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर, प्रा. बी. एस. पाटील, प्रा. ललिता सपकाळे, प्रा. स्वाती लोखंडे, प्रा. ज्योती भोळे उपस्थित होते
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना न्या. संत यांनी अभिरूप न्यायालय स्पर्धा ही स्पर्धकांसाठी आयुष्यभरासाठीची आठवण असते. स्पर्धेमध्ये जजेसला निर्णय घेणे कठीण झाले पाहिजे असा युक्तिवाद करण्याचे आवाहन केले. तसेच केसीई सोसायटी आणि एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.
तसेच न्यायाधीश शेख यांनीही चांगले वकील न्यायाधीशाला चांगला निर्णय घ्यायला भाग पाडतात तेव्हा चांगले वकील होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. ॲड. प्रकाश पाटील यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना गुणवत्तापूर्ण विधी शिक्षणासाठी महाविद्यालय आणि जिल्हा न्यायालयात उत्कृष्ट सहकार्य असल्याचे स्पष्ट केले. महाविद्यालयाने अनेक न्यायाधीश आजपर्यंत घडवले आहेत. भविष्यातही असेच न्यायाधीश घडवेल असे आश्वासित केले व अभिरुप न्यायालयातील स्पर्धकांच्या युक्तिवादाचा स्तर खूप दर्जेदार राहत आल्याचे स्पष्ट करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच ॲड. प्रमोद पाटील यांनी केसीई सोसायटीच्या वाटचालीचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात उपस्थित मान्यवर पाहुणे आणि सर्व सहभागी स्पर्धाकांचे स्वागत केले. त्यानंतर न्या. संत यांचा संस्थेच्या वतीने ॲड. प्रकाश बी. पाटील यांनी सत्कार केला. व श्रीमती संत यांचा सत्कार डॉ. विजेता सिंग यांनी केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले व महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहुजा यांची सहयोगी प्राध्यापक पदी पदोन्नती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अमृत चव्हाण आणि रोहिणी मनोरे यांची न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदी निवड झाल्याकारणाने त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी रिजवान पठाणचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये निवड झाल्यामुळे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अमिषा मुंदडा आणि ईशा पिंपळेकर यांनी केले व शेवटी डॉ. रेखा पाहूजा यांनी आभार मानले.