खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | बँक खात्याची व क्रेडिट खात्याची मुदत वाढवून देण्याच्या नावाखाली एका युवकाची 83 फसवणूक करण्यात आली युवकाशी मोबाईल वरून संपर्क साधा त्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून ठराविक वेळेत परस्पर रक्कम काढण्यात आली. याप्रकरणी खामगाव येथील शिवाजीनगर पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
टिळक राष्ट्रीय विद्यालया नजीक असलेल्या शॉकत कॉलनीतील मोहम्मद फैजल मोहम्मद अनीस वय वर्ष 27 हा मजुरी करणारा एका युवकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. की त्यामध्ये ज्याचे भारतीय स्टेट बँकेत खाते आहे या खात्याची तसेच क्रेडिट कार्डची मुदत वाढवून देण्यासाठी त्याला अनोळखी समाजाचा फोन आला बँक अधिकारी बोलतो असे सांगत त्याने बँकेतील खात्याची आणि क्रेडिट कार्ड ची माहिती मिळविली. तसेच ओटीपी मिळून खात्यातील 83 हजाराची रक्कम परस्पर काढून घेतली.
या प्रकरणी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 415 420 सह कलम 66 सी 66 डी केला .पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण परदेशी करीत आहे.