फैजपूर, प्रतिनिधी । दरवर्षी खानापूर चिनावल ते पंढरपूर डिगंबर महाराज चिनावलकर पायी दिंडी जात असते. यापरंपरेनुसार सोमवारी खानापूर येथून दिंडीचे प्रस्थनं मोठया भक्तिभावाने झाले. या दिंडीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ १० वारकरी सहभागी झाले आहेत.
खानापूर चिनावल ते पंढरपूर दिंडी सोहळा वै. डिगंबर महाराज चिनावलकर यांनी सुरू केला आहे. पुढे वै. विठ्ठल महाराज हंबर्डीकर व वै. अरुण महाराज बोरखेडेकर यांनी अनेक वर्षे सेवा केली. आता हभप दुर्गा दास महाराज नेहते खिर्डीकर प्रमुख म्हणून दिंडी चालक सेवेत आहेत. दिंडीचे प्रस्थन सोमवार २९ जून रोजी झाले. याप्रसंगी दिंडी प्रमुख हभप दुर्गदास महाराज नेहते, विणेकरी हभप भगवन्त महाराज चौधरी खानापूर व भास्कर बोन्डे, पांडुरंग पाटील, हेमा बोन्डे कळमोदा, दिगंबर महाराज मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, भूषण नारखेडे, राहुल साळी, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल सर भंगाळे, किशोर बोरोले, लीलाधर कोल्हे, बोरखेडेकर व हंबर्डीकर भजनी मंडळ उपस्थित होते. हरीश अत्तरदे, कमलाकर चौधरी, सांगवीकर भजनी मंडळ उपस्थित होते. सर्व दिंडीच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे हे आदिशक्ती मुक्ताईचे सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूर येथे जाणार आहेत.