यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डांभूर्णी येथे अल्पवयीन मुलाच्या हत्यानंतर ग्रामस्थांनी गैरसमजूतीतून सरपंचाच्या घराची तोडफोड केल्याप्रकरणी सरपंच संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करत संबंधीत तरूणांवर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन यावल पोलीसांनी देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, डांभुर्णी तालुका यावल ग्रामपंचायतीचे सरपंच पुरूजीत गणेश चौधरी यांच्या घरावर काही समाजकंटकांनी राजकीय विरोधकांनी त्यांच्या घराची नासधूस करून तोडफोड केली. या प्रकारात सरपंचांच्या घरातील मौल्यवान साहित्य फर्निचर मोठे नुकसान करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. सदर डांभुर्णी येथे घडलेल्या घटनेशी सरपंच चौधरी यांचा काहीएक संबंध नसल्याचे सांगून उलट त्यांनी गावात शांतता राहावी, असे वेळोवेळी ग्रामस्थांना आव्हान केले आहे. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांना त्यांचे हे कार्य आवडले नसावे म्हणून गावातील काही मंडळींनी सामूहिकरित्या जमाव करून त्यांच्या घराच्या तोडफोडच्या घटनेचा व यात सहभाग करणाऱ्यांचा सरपंच संघटना तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत असून अशा कृत्य करणाऱ्या समाजात समाजकंटकांना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष देवदास पाटील, नरेंद्र पाटील, सरपंच मनवेल विलास पाटील, सरपंच महेलखेडी उमेश सोनवणे, सरपंच थोरगव्हाण साजिया, सत्तार तडवी, सरपंच दहिगाव राजेंद्र पाटील, सरपंच चिखली खुर्द हजराबाई सरदार तडवी, सरपंच सावखेडा सिम टिकाराम मुरलीधर चौधरी, सरपंच किनगाव बुद्रुक आणि बोराडे येथील सरपंच उज्जैनसिंग भावलाल राजपूत यांच्या यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.