डंपर-क्रूझरच्या अपघातातील बळींची संख्या १२ वर

wp 15806997635187985833066142744497

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथे रात्री डंपर आणि क्रूझरच्या झालेल्या अपघातातील बळींची संख्या १२ वर गेली असून यातील सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गावर असणार्‍या हिंगोणा गावाजवळ रात्री अकराच्या सुमारास डंपर आणि क्रूझरचा भीषण अपघात झाला. प्रारंभी यात दोन जण मृत तर अन्य जखमी झाले होते. यातील उर्वरित जखमींचाही मृत्यू झाल्याने सकाळी ही आकडा दहावर पोहचला. तर नंतर गाडीचा वाहक धनराज गंभीर कोळी आणि शुभम चौधरी (दोन्ही रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) यांचादेखील मृत्यू झाला. यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता १२ इतकी झाली आहे.

दरम्यान, आज सकाळी या अपघाताची बातमी मिळताच आमदार शिरीषदादा चौधरी आणि माजी आमदार हरीभाऊ जावळे यांनी यावल जिल्हा रूग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. नंतर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले आणि अपर अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी अपघातस्थळी पाहणी केली. यातील मृत झालेल्या सहा जणांचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रूग्णालयात तर सहा जणांचे शवविच्छेदन जळगाव जिल्हा रूग्णालयात करण्यात आले.

Protected Content