Home राजकीय ठाकरे सरकारमुळे मुंबईकरांना ५ हजार कोटींचा फटका; किरीट सोमय्या यांची टिका

ठाकरे सरकारमुळे मुंबईकरांना ५ हजार कोटींचा फटका; किरीट सोमय्या यांची टिका


मुंबई वृत्तसंस्था । उद्धव ठाकरे सरकारच्या उद्धटपणामुळे मुंबईकरांना पाच हजार कोटींचा फटका बसला असल्याची घणाघाती टीका भाजप नेता किरीट सोमय्या यांनी केली. मुंबईतील मेट्रो प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे पाच वर्षांसाठी लांबला असून, याचा मोठा फटका मुंबईकरांना बसल्याची टीका त्यांनी केली. कांजूरमार्ग येथील जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून त्यावर राज्य सरकारने मेट्रोचे बांधकाम करणे हे खोटेपणाचे काम असून, त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी सोमय्यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फसवणूक करत आहेत. मेट्रो कारशेडबाबत तसा रिपोर्ट आला होता, ही जागा देता येत नाही. बालहट्ट आणि राजहट्टापोटी ठाकरे यांनी जे केले, त्यामुळे ठाकरे सरकारने मुंबईकरांची माफी मागावी आणि ठाकरे परिवार आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असं किरीट सोमय्या म्हणाले.


Protected Content

Play sound