मुंबई प्रतिनिधी । उध्दव ठाकरे यांना प्रशासनाचा कोणताही अनुभव नसल्यामुळे राज्यातील व विशेषत: मुंबईतील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे उद्या राज्यभरात उध्दव ठाकरे यांच्या सरकारविरूध्द आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर, आज एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, उध्दव ठाकरे यांना प्रशासन चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रातही मुंबईत करोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. अशा स्थितीत ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नवीन त्यांना प्रशासकीय अनुभव नाही. पहिल्या लॉकडाउनपासून धोरणात्मक निर्णय घेण्यात या सरकारने चुका केल्या असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.