जळगाव प्रतिनिधी । समोरून भरधाव येणाऱ्या कारला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरचा ब्रेक मारल्याने ट्रॉलीचा हुक तुटला. यात ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील अंजळगाव येथील राहणाऱ्या दिपक जगन्नाथ महाजन वय 30 हा आपल्या चुलतभाऊ मोहन रमेश महाजन यांच्या सोबत वेगवेगळ्या ट्रॅक्टरवर जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे सकाळी 10 वाजता गुरांना लागणारा (चारा) कडबा घेण्यासाठी ट्रॅक्टरवरती गेले होते. मजुरांच्या मदतीने कडबा दोन्ही ट्रॅक्टर भरून दुपारी 1.30 वाजता मामुराबद येथून निघाले.
दीपक महाजन हा ट्रॅक्टर क्रमांक एम एच 19 बीजि 5237 वर बसलेले होते कवियीत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या अशोक हॉटेल जवळ जळगाव ओव्हर टेक करणार कार च्या चालकाचे नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या कारवर आदळली, कार ट्रॅक्टरवर येत असल्याचे पाहून ट्रॅक्टर चालक दीपकने ट्रॅक्टरचा अचानक ब्रेक दाबला. या अचानक लागलेल्या ब्रेकमुळे ट्रॅक्टर ट्रॉलीचा हुक तुटला त्यात ट्रॉली पलटी झाली.सोबत ट्रॅक्टरदेखील पलटी झाले, यामध्ये ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर इंजिनच्या खाली दबला गेल्याने दिपकचा जागीच मृत्यू झाला.
मयत दिपकच्या पश्चात पत्नी भावना, 5 वर्षाचा मुलगा लकी, दीड वर्षाचा मुलगा हितेश, भाऊ देवानंद, आई वत्सलाबाई आणि वडील जगन्नाथ असा परिवार आहे. दिपकचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला होता.
दरम्यान कार चालक फरार झाला आहे. अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलीस करचारी घनश्याम पवार, प्रदीप बडगुजर, सुनील पाटील, हितेश पाटील, चंद्रकांत पाटील यांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.