Home क्राईम ट्रान्सपोर्ट नगरात आढळला मृतदेह; एमआयडीसी पोलीसात मृत्यूची नोंद

ट्रान्सपोर्ट नगरात आढळला मृतदेह; एमआयडीसी पोलीसात मृत्यूची नोंद


Crime

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथील देशी दारूच्या अड्डयाजवळ एका व्यक्ती मयत स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याबाबत माहिती अशी की, धान्य मार्केटमध्ये बारदार शिलाईचे काम करणारा कामगार प्रकाश दौलत राजपूत (वय – 30) रा. तरसोद ता. जळगाव हे शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथे देशी दारूच्या अड्डयासमोर मयत स्थितीत अढळून आले. सुरूवातीला अनोळखी म्हणून जिल्हा सामान्य शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले होते. मयताची ओळख पटविण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound