यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डोंगर कठोरा आदीवासी आश्रमशाळेतील आत्महत्या केलेल्या कर्मचारी यांच्या मुलाने वडीलांच्या आत्महतेस कारणीभुत असलेल्या व्याक्ती विरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, संशयीत आरोपीस पोलीसांनी अटक केली आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील आदीवासी आश्रम शाळेतील कर्मचारी व त्यांचा मुलगा यांच्याविरुद्ध चार दिवसापुर्वी भांडण झाल्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे आपली समाजात आपली प्रतिमा मलीन झाली व चारित्र्यहनन झाले या भावनेतून नामदेव खैरनार यांनी टोकाचा निर्णय घेत आपले आयुष्य संपविले होते.
या प्रकरणी मयताच्या मुलाने पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यात त्यांनी नमूद केले आहे की, संशयीत आरोपी प्रमोद डांगरे यांनी दिलेल्या धमक्यामुळे फिर्यादीचे मरण पावलेले वडील नामदेव खैरनार हे खुप दहशतीखाली होते . या सर्व प्रकारामुळे फिर्यादीच्या वडिलांना खुप मानसिक त्रास झाला या सर्व प्रकाराचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याने नामदेव खैरनार यांनी अखेरीस दिनांक ८ मे रोजी डोंगर कठोरा आदीवासी आश्रमशाळेच्या राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या करून आपले जिवन संपवण्याचे पाऊल उचलले.
याबाबत आत्महत्या करणारे नामदेव दगडु खैरनार यांचा मुलगा योगराज नामदेव खैरनार यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने संशयीत आरोपी प्रमोद रघुनाथ डोंगरे व सुजाता डोंगरे यांच्याविरुद्ध भादंवी ३०६ , ५०६ , ३४प्रमाणे गुन्हा करण्यात आला असुन ,आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास यावलचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.