टक्केवारीच्या वादानंतर भाजपवर चौफेर टीका (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी ।  गुरूवारी महापालिकेत महापौरांच्याच दालनात महापौरांसमोर भाजपच्या एका नगरसेविकेच्या पती असलेले महापालिका कर्मचारी बाळासाहेब चव्हाण  आणि भाजपचे  पदाधिकारी असलेले ठेकेदार भूपेश कुलकर्णी यांच्यात टक्केवारीच्या वादातून फ्रीस्टाईल झाली होती. त्यानंतर माजी मंत्री गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे यांच्यावर विरोधकांनी खापर फोडले असून सत्ताधारी भाजपवर चौफेर टीका होते आहे . 

हा वाद मिटवण्याचा प्रयत्न आमदार भोळे यांनीही केला मात्र चव्हाण यांच्यावर पालिका प्रशासन कारवाई करणार नाही अशी खोचक टीका केली जाते आहे. प्रशासन सत्ताधाऱ्यांचे मिंधे असल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र भैय्या पाटील म्हणाले कि, लोकांच्या सेवेसाठी आपल्याला निवडून दिले आहे याचा विसर पडलेले लोक  टक्केवारीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी  भांडण करीत आहेत हे पाहून भाजप आता तत्वांचा पक्ष राजिलेला नाही, टक्केवारीचा पक्ष झाला आहे याची खात्री पटते. महापालिका निवडणुकीत माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आम्हाला निवडून द्या, शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू , स्मार्ट सिटी सारख्या कामांसाठी १०० कोटी  आणू असे आश्वासन दिले होते. ते खोटे ठरले आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे धुळीमुळे लोक आजारी पडत आहेत. कोरोना महामारीच्या काळात या महापालिकेकडे फक्त एक रुग्णवाहिका आहे स्मशानात मृतदेहांना अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागते अशी परिस्थिती भयाण आहे. आता गिरीश महाजनांनी आत्मपरीक्षण करावे .आपले नगरसेवक कशा पद्धतीने काम करत आहेत याच्यावरपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे.  हा कालचा वाद मिटविण्याचे प्रयत्न आ. भोळे यांना करावे लागले हे वर्तमानपत्रात वाचून खेद  वाटला. १०० कोटींच्या आश्वासनाला भुलून भाजपला निवडून आणले हा चूक झाली असा पश्चाताप आता शहरातील लोकांना होतोय, असेही ते म्हणाले. 

महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन म्हणाले कि , भाजपची हीच परंपरा कायम आहे , २००० साली के डी पाटील नगराध्यक्ष असताना अशाच भ्रष्टाचारात ते सापडले होते तीच परंपरा आता कायम आहे  यात नवीन काही नाही आज त्यांनी खुर्च्या उचलल्या उद्या ते एकमेकांचे डोके फोडतील अशी परिस्थिती आहे शिस्तबद्ध म्हटलं जाणारा भाजप आता रसातळाला गेला आहे भ्रष्टाचाराचा पक्ष झाला आहे महापालिकेच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टक्केवारी वाढलेली आहे, भ्रष्टाचार फोफावलेला आहे . अन्य पक्षांमधून या पक्षात आलेल्या लोकांमुळे या पक्षाची प्रतिमा आता पूर्णतः मालिन झालेली आहे . भ्रष्टाचार हा भाजपचा केंद्रबिंदू बनलेला आहे . आयुक्त सत्ताधारी भाजपचे हाताचे बाहुले बनलेले आहेत त्यांच्याकडे तक्रारी करूनही ते चौकशी करीत नाहीत भाजप सांगणार तशीच कामे होतात त्यामुळे या लोकांवर त्यांच्याकडून कारवाई होण्याची अपेक्षा आम्हालाही  नाही .  आमदार भोळे यांना आता या शहरात फक्त भांडण मिटवण्याचा उद्योग उरलेला आहे कारण शहरात कुठलीही विकासकामे होत नाहीत त्यांची हि दुसरी टर्म  आहे विकास कामांच्या बाबतीत ते प्रभाव दाखवू शकलेले नाहीत त्यामुळे त्यांना अशा पक्षांतर्गत भांडंणमध्ये एरंडोली करण्याचेच काम राहिले आहे . त्यापेक्षा त्यांनी विकासकामांवर लक्ष द्यावे असे आमचे म्हणणे आहे .

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1645330325634666

 

Protected Content