झोपेत उलटी घशात अडकल्याने ८ वर्षीय मुलीचा मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामपेठ भागात झोपेत उलटी झाली, व उलटी घशात अडकल्याने आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवार, २४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.  अनुष्का मुकेश भोई (जावरे) (वय-८) असे मयत या मुलीचे नाव आहे.

 

जळगाव शहरातील जुने जळगाव भागातील भोईवाड्यातील रामपेठमध्ये मुकेश एकनाथ जावरे व अलका मुकेश जावरे हे आपल्या आठ वर्षांची मुलगी अनुष्का हिच्यासोबत वास्तव्यास आहेत. अनुष्का ही जळगाव शहरातील महापालिकेची शाळा क्रमांक ३ मध्ये सिनियर केजी या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवारी अनुष्का ही सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली, दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आली. यादरम्यान अनुष्का ही बर वाटत नव्हतं, तिचं अंग गरम असल्याने, तिला ताप असावा म्हणून अनुष्का हिची आई अलका हिने अनुष्का हिला झोपविण्याचा प्रयत्न केला, याचदरम्यान अनुष्काला अचानक दोन वेळा उलटी झाली, गुळण्या करुन पाणी पिल्यावर अलका यांनी पुन्हा अनुष्काला झोपवलं. मात्र पुन्हा अनुष्का हिला त्रास जाणवू लागला. झोपली असतांनाच अनुष्का हिला पुन्हा उलटी झाली, ही उलटी घश्यात अडकली, उलटी घशात अडकल्याने तिला श्वास घ्यायला त्रास झाला व यातच ती बेशुध्द पडली. अचानक काही वेळातच अनुष्काची प्रकृती खालावल्याने तिला आई वडीलांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत अनुष्कान हिने जगाचा निरोप घेतला होता, रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. एकुलत्या एक मुलीच्या अचानकच्या अशा जाण्याने अनुष्का हिच्या आई वडीलांना मोठा मानसिक धक्का धक्का बसला आहे. या घटनेने रामपेठ परिसर सुध्दा सुन्न झाला आहे, घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Protected Content