जळगाव, प्रतिनिधी । शहरातील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांगांना आवश्यक असलेले जेवण, औषधी, शिवाय दवाखान्यात जाण्या-येण्या संबंधी काही अडचणी असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने श्री. शालीग्राम लहासे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची जेवणाची, औषधांची, दवाखान्यात जाण्यायेण्याची गैरसोय होवू नये, महानगरपालिकेने शहरातील स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने सुविधा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त सुशील कुलकर्णी यांनी दिली आहे.
ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींनी मदतीसाठी समन्वय अधिकारी श्री. लहासे यांच्या 7385484227 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. तसेच त्यांच्या या क्रमांकांवरील व्हॉटसॲप अथवा एसएमएस करुन संपर्क साधावा. शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग नागरिकांच्या मदतीसाठी शहरातील केशवस्मृती प्रतिष्ठान, भ्रमणध्वनी- 9823017853, मनोबल केंद्र, भ्रमणध्वनी क्रमांक- 9822476545, मुक्ती फाऊंडेशन, भ्रमणध्वनी- 9850408374, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, भ्रमणध्वनी क्रमांक- 9325024057, रेडक्रॉस सोसायटी, भ्रमणध्वनी- 8788841465 या जळगाव शहरातील स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे आल्या असून त्यांच्यामार्फत आवश्यक त्या सुविधा तात्काळ पुरविण्यात येतील. असे आयुक्त श्री. कुलकर्णी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.