Home धर्म-समाज ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन


पुणे (वृत्तसंस्था) ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे पुण्यामध्ये आज (मंगळवारी) पहाटे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.

 

जयराम कुलकर्णी यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजता पुण्यातील वैकुंठमध्ये होणार अंत्यसंस्कार होणार आहेत. शाळेत असल्यापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत त्यांनी ‘मोरुची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले; तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला. चल रे लक्ष्या मुंबईला, खट्याळ सासू नाठाळ सून, खरं कधी बोलू नये, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, रंगत संगत, थरथराट इत्यादी चित्रपटातून त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांत जयराम कुलकर्णी यांनी पोलिसांच्या भूमिका साकारल्या.


Protected Content

Play sound