जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सूक्ष्मसिंचन प्रणाली उत्पादन भारतातील सर्वात मोठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे एकत्रित आणि एकल निकाल आज घोषित केले.
कंपनीच्या एकत्रित निकालामध्ये 4.7 कोटी रूपयांचा नफा नोंदवण्यात आला आहे. गत वर्षाच्या ह्याच तिमाहीच्या तुुलनेत या वर्षी कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या जैन इरिगेशनच्या संचालक मंडळाच्या बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सांगितले. तिसऱ्या तिमाहीत जैन इरिगेशनचे एकत्रित उत्पन्न 2020 कोटी झाले. तसेच जैन इरिगेशन कंपनीने वर्षाच्या तुलनेत 25 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवली (कर, व्याज व घसारापूर्व नफ्याचा मार्जिन 11.8 टक्के राहीला).
पहिल्या 9 महिन्यात, एकत्रित महसूल 12.5 टक्क्यांनी वाढून तो 5670 कोटी रूपये (कर, व्याज व घसारापूर्व नफ्याचा मार्जिन 11.9 टक्के राहीला) नोंदवला. 31 डिसेंबर 2022 रोजी संपणाऱ्या 9 महिन्यांच्या काळात कंपनीने 468.3 कोटी रूपये (एकत्रित आधार) खेळत्या भांडवलातील बदल आणि 239.2 कोटी (एकल आधार) एवढी रोख शिल्लक निर्माण केली. निव्वळ खेळत्या भांडवलाचे चक्र 76 दिवसापर्यंत डिसेंबरमध्ये 21 डिसेंबरमध्ये एकल आधारावर सुधारणा झाली आहे.कंपनी अजून यामध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. तसेच जैन इरिगेशन कंपनीने महाराष्ट्रात “जल जीवन मिशन” रेट करारावर पुरवठा करीत आहे. कंपनी मार्जिनमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे आणि दीर्घ कालीन ध्येय साध्य करण्यासाठी रोख प्रवाहात सुधारणा होईल.