Home Cities जळगाव जेसीआय जळगावचे पदग्रहण उत्साहात

जेसीआय जळगावचे पदग्रहण उत्साहात

0
46

जळगाव प्रतिनिधी । जेसीआय जळगावचा पदग्रहण व पुरस्कार वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात जेसीआय २०१८चे अध्यक्ष जेसी वरुण जैन यांनी नवीन अध्यक्ष जेसी प्रतीक शेठ यांनी अध्यक्षपदाची शपथ देत गॅव्हेल व पीन प्रदान केली. सचिव मोईन खान, जेसीरे चेअर पर्सन श्रद्धा मोरे व ज्युनियर जेसी चेअरमन यशोधन पाटील यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. याच कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मृणालिनी चौगुले यांना जेसीआयतर्फे गौरविण्यात आले. या वेळी डी. आर. पाटील, जेसीआयचे माजी अध्यक्ष जेसी सय्यद अल्ताफ अली, १३ झोनचे प्रेसिडेंट जेसी भरत बजाज, व्हाईस प्रेसिडेंट जेसी अभिषेक कान्स्थियाँ यांची उपस्थिती होती.
कार्यक्रामाला रफिक शेख, प्रमोद गहलोत, माजी अध्यक्ष आबासाहेब पाटील, आनंद नागला, शरद मोरे, मयूरेश निंबाळकर, संदीप वाणी आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound