रावेर, प्रतिनिधी ।राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे प्रफुल्ल लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रावेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक पार्टीवतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची बदनामी करणाऱ्या प्रफुल्ल लोढावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसह श्री. खडसे यांनी ईडीमार्फेत नोटीस पाठवून सूडबुद्धीचे राजकारण करणाऱ्या भाजपचा निषेध करण्यात आला. निवेदनावर माजी आमदार अरुणदादा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश महाजन, तालुकाध्यक्ष नीलकंठ पाटील, प.स. सदस्य दिपक पाटील, योगेश पाटील, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष शे. महमूद हसन मन्यार, युवक शहराध्यक्ष प्रणीत महाजन, कुणाल महाजन, शिवाजी पाटील, सुनील कोंडे आदीच्या स्वाक्षरी आहेत.