नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीतील व्यावसायिकाने सासू आणि पत्नीला संपवण्यासाठी सासू, सासरे, मेव्हणी आणि पत्नीला माशाच्या कालवणासोबत थेलियम खाऊ घातले. त्यानंतर सासू व मेहुणीचा नृत्यू झाला आणि त्याची पत्नी कोमामध्ये गेली.
दिल्लीच्या एका रिअल इस्टेट व्यावसायिक वरुण अरोरा यांनी इराकचा तानाशाह सद्दाम हुसेनबाबत इंटरनेटवर वाचलं होतं की तो आपल्या राजकीय विरोधकांना मारण्यासाठी थेलियम नावाचा विषारी पदार्थाचा वापर करत होता. याच आयडियावर त्याने हा कट रचला
या व्यक्तीचे सासरे आणि होमिओपॅथी औषधींचे निर्माता देवेंद्र मोहन शर्मा हे पोलिसांकडे पोहोचले. त्यांनी त्यांच्या पत्नी अनिता शर्मा यांचा गंगा राम रुग्णालयात मृत्यू झाला व . पत्नीच्या हत्येप्रकरणी देवेंद्र शर्मा यांना जावई वरुण अरोरावर संशय आहे असे सांगितले . सासऱ्याने फेब्रुवारी महिन्यातील त्या घटनेचा उल्लेखही केला जेव्हा या जावयाने संपूर्ण कुटुंबाला मासे बनवून खाऊ घातले, पण त्याने आपल्या मुलांना ते खाऊ दिलं नाही, तसेच स्वत:ही ते खाल्लं नाही. या खाण्यात त्याने विषारी पदार्थ मिसळला होता.
पोलिसांनी जेव्हा मृतक सासूचं शवविच्छेदन करवलं तेव्हा महिलेच्या शरिरात थेलियम मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या पत्नीचीही आरोग्य तपासणी केली आरोपीच्या पत्नीच्या शरिरातही थेलियमची मात्रा मोठ्या प्रमाणात आढळून आली. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या लॅपटॉप आणि सिस्टिम जप्त करुन तपास केला. यामध्ये पोलिसांना त्याच्या इंटरनेट हिस्ट्रीमध्ये सद्दाम हुसेन संबंधित माहिती मिळाली. यामध्ये त्याने वाचलं होतं की कशा प्रकारे सद्दाम हुसेन आपल्या राजकीय विरोधकांना जीवानिशी मारण्यासाठी थेलियमचा वापर करतो. पोलिसांनी आरोपी व्यावसायिक वरुण अरोराला अटक केली आहे.
थेलियम एक विषारी धातू रासायनिक तत्व आहे. याचा शोध इंग्रजी वैज्ञानिक विलिअम क्रुक्स यांनी लावला थेलियमचा उपयोग किटक आणि उंदिरासाठी विष म्हणून केलं जात होतं. कुणाचा जीव घेण्यासाठी या थेलियमची चिमुटभर मात्राचं पुरेशी आहे.