जुन्या वादातून कुटुंबातील चार जणांना मारहाण; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादातून तरूणासह घरातील चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी ५ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, किरण गंगाराम खैरनार (वय-३४) रा. सम्राट कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दुध विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी ५ मार्च रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगरात राहणारा ललीत दिक्षीत हा त्याच्या घरी आला. त्या ठिकाणी येवून जुन्या वादातून किरणच्या शर्टाची कॉलर पकडून तू माझ्या भावाला का मारतो असे सांगून शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यावेळी किरणचा भाऊ हेमंत खैरनार, वहिनी मिनाक्षी खैरनार, आई कमलाबाई खैरनार हे आवराआवर करण्यासाठी आले असता त्यांनी देखील शिवीगाळ करून ढकलाढकल केली. तर कमलाबाई खैरनार यांना बाहेर ढकलून दिले. तसेच रस्त्यावर पडलेले दगड कुटुंबावर फेकून मारले. यात चौघेजण जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी किरण खैरनार याने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी ५ मार्च रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ललीत दिक्षीत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.

Protected Content