Home क्राईम जुन्या भांडणाच्या कारणावरून वृध्दाला बेदम मारहाण

जुन्या भांडणाच्या कारणावरून वृध्दाला बेदम मारहाण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानवड येथील ६२ वर्षीय वृध्दाला जुन्या भांडणाच्या कारणावरून तिन जणांनी बेदम मारहाण करून दुखापत करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मंगळवारी १७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, प्रविण तान्हू पाटील (वय-६२) रा. धानवड ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून मंगळवारी १७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता गावातील रविंद्र आनंदा पाटील, भुषण आनंदा पाटील आणि आनंदा मोतीराम पाटील सर्व रा. धानवड ता.जि.जळगाव ह.मु. सुप्रिम कॉलनी जळगाव यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दुखापत केली. तसेच आमच्या नांदी लागला तर जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी प्रविण पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता संशयित आरोपी रविंद्र आनंदा पाटील, भुषण आनंदा पाटील आणि आनंदा मोतीराम पाटील सर्व रा. धानवड ता.जि.जळगाव ह.मु. सुप्रिम कॉलनी जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.


Previous articleतरूणाची दुचाकी लांबविली
Next articleविना परवाना वाहनांवर कारवाई व्हावी
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound