Home क्राईम जुनोने येथे २२ वर्षीय तरूण बेपत्ता!

जुनोने येथे २२ वर्षीय तरूण बेपत्ता!


चाळीसगाव, प्रतिनिधी| गावात जाऊन येतो, असे सांगून गेलेला तरूण बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील जुनोने येथे उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात फिर्याद करण्यात आली आहे.

 

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील जुनोने येथील शेख सलमान शेख सलीम (वय-२२) हा रविवार,१७ ऑक्टोबर रोजी घरच्यांना गावात जाऊन येतो, असे सांगून गेला. मात्र तो अद्यापपर्यंत घरी परतला नाही. म्हणून घरच्यांनी त्याला आजपावेतो परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु तो मिळून आला नाही. शेख सलमान शेख सलीम हा हरवल्याची खात्री झाल्यानंतर त्याचा वडील शेख सलीम शेख गुलाब यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास ओंकार भास्कर सुतार हे करीत आहेत.


Protected Content

Play sound