जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जी.एस.ग्राऊडजवळ तरुणाच्या दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईम अकिल पिंजारी (वय १८) रा. आंबेडकर नगर, जळगाव याने दिलेल्या तक्रारीनुसार असे की, साईम हा त्याच्या मित्रासोबत जी.एस.ग्राऊंडच्या बाजूला भिंतीला लागून असलेल्या देवा हेअर सलून दुकानाच्या समोर उभा होता. यावेळी आदित्य खडके याच्यासह पाच ते सहा जणांनी कारण नसतांना साईम यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, फायटरने, दगडाने मारहाण केली. यात साईम तसेच त्याचा चुलत भाऊ अर्षद निसार पिंजारी यास मुका मार लागला आहे. तर साईम सोबत असलेल्या सय्यद अब्रार सय्यद जावेद यांच्या डोक्याला दुखपत झाली आहे, तसेच मोहम्मद अबुझर मोहम्मद साबीर पिंजारी याच्या ओठाला जखम झाली आहे. अशाप्रकारे मारहाणीत चौघेही जखमी झाले आहेत. अशा साईम अकिल पिंजारी याने दिलेल्या तक्रारीनुसार आदित्य खडके याच्यासह पाच ते सहा जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात दंगलीचा गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार जावरे करीत आहेत.
तर जयेश किशोर जावरे (वय १८) रा. तळेले कॉलनी, जुनाखेडी रोड याने दिलेल्या तक्रारीनुसार असे की, जयेश हा त्याचा मित्र आदित्य खडके याच्यासोबत क्लासच्या जिन्याच्या पायरीवर उभा असतांना, साईम पिंजारी व त्याच्यासोबत सात ते आठ जणांनी जयेश यास पायावर , मांडीवर फायटरने मारहाण केली. तर जयेश याचा मित्र रितेश सुरळकर यास डोक्यात दगड मारत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर आदित्य खडके यास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. अशा जयेश याने दिलेल्या तक्रारीवरुन साईम अकिल पिंजारी, हर्षद या दोघांसह सात ते आठ जण यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश देशमुख हे करीत आहेत.