जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आपण स्वतःला यशस्वी करण्यासाठी स्वतः मध्ये काहीप्रमाणात अनुशासन आणलेच पाहिजे असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. डॉ. विजयकुमार महेश्वरी यांनी केले ते. छत्रपती संभाजी नाट्यगृहात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा माहेश्वरी समाजातर्फे आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामसुंदर सोनी, महेश आवास योजना समितीचे प्रमुख अशोक बंग, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीकिसन भन्साली हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कुलगुरू श्री. महेश्वरी पुढे म्हणाले की, अनुशासन आणणे म्हणजेच वेळेचे महत्त्व, पैशाचे महत्त्व, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व जर का आपण पाळलेत तर आपण या वसुंधरेचे पाईक आहोत असे होईल. पुढील येणारा काळ हा तंत्रज्ञानाने नेतृत्व असणारा काळ असेल आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे, बदलत्या काळानुरूप आपल्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेचे महत्त्व वाढले पाहिजे, आपला भविष्यकाळ मग सुखद आणि सुंदर होईल.
कुलगुरू प्रा. डॉ. विजयकुमार माहेश्वरी यांचा नागरी सत्कार म्हणजे कबचौ उमवि परिक्षेत्रातील तीनही जिल्हे जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील समाजातील लोकांनी एकत्रीत येऊन कुलगुरू महोदयांचा सत्कार केला.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष श्रीकिसन भंसाली म्हणाले की, समाजात समाजउपयोगी शिक्षा क्षेत्र आणि रहिवासी क्षेत्र यांचा एकत्रित विकास जर झाला तर त्याहून अधिक चांगली गोष्ट होऊ शकत नाही. यावेळी महेश आवास योजना समितीचे राष्ट्रीय संयोजक अशोक बंग म्हणाले की, मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा पैकी निवारा ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण आज पूर्ण करू शकतो आहे. अन्न, वस्त्र याकरिता शिक्षण क्षेत्र म्हणून आदरणीय कुलगुरू हे आपणास मार्गदर्शनास कायम तत्पर आहेतच अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात सभापती श्यामसुंदर सोनी असे म्हणालेत की, कोरोना काळाने आपल्या सगळ्यांना पारिवारिक संकल्पना आणि त्याचे महत्त्व पटले आहे. ते पुढे म्हणाले कुलगुरू डॉ. विजयकुमार माहेश्वरी सरांच्या निमित्ताने जळगावातील आपल्या समाजाचा सत्कार आणि सन्मान झाला आहे. आपण सगळ्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले नाव यशस्वी केले पाहिजे.
दरम्यान, स्व.सौ. वनिता नारायण लाठी, महेश नगर, जळगाव याबद्दलची माहिती आणि प्रथम ५ इच्छुकांचे अर्ज स्विकारणे समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. हा सर्व कार्यक्रम समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आणि पुढील पिढीच्या मार्गदर्शनासाठी आयोजित केला होता असे प्रा. संजय दहाड, प्रा. बी.जे. लाठी आणि सुत्रसंचालक शेफाली लाठी यांनी तर आभार जिल्हा सचिव माणकचंद झवर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.संजय दहाड, मनीष झवर, ऍड.राजेंद्र माहेश्वरी, प्रदीप मणियार, दीपक लढ्ढा, केदार मुंदडा, रवी लढ्ढा, रोहन बाहेती, आशिष कासट, मधुर झवर, सागर मणियार, विजय झंवर, शिवा तोष्णिवाल, नरेंद्र काबरा, तेजस देपुरा तसेच जिल्हा सभेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
https://www.facebook.com/watch/?v=505535914565466&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing