Home Cities जळगाव जीडीसी अॅंड ए परिक्षा: सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कुलमध्ये असणार बैठक व्यवस्था

जीडीसी अॅंड ए परिक्षा: सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कुलमध्ये असणार बैठक व्यवस्था

0
29

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत दि.२३, २४ व २५ ऑक्टोबर २०२१ रोजी जळगाव केंद्रावर जी.डी.सी.अॅंड ए. व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा घेण्यात येणार आहे.

 

जळगाव केंद्राची परीक्षा सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कुल, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेजवळ, या  ठिकाणी घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी बसलेल्या परिक्षार्थींनी बैठक व्यवस्था अथवा इतर काही तांत्रिक अडचणी असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, २ रा माळा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टप्पा क्र.३, आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी, जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी केले आहे.

 


Protected Content

Play sound