जीएम हॉस्पिटलमध्ये स्वस्त आरोग्य सेवा स्वप्नवत : व्यवस्थापन खासगी डॉक्टरांकडे

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी ।  जामनेर तालुक्यातील जनतेला उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्दात्त हेतूने ग्लोबल महाराष्ट्र हे हॉस्पिटलची उभारणी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केली होती. मात्र, हे हॉस्पिटल त्यांनी जळगाव येथील एका हॉस्पिटलला चालविण्यासाठी देऊन नागरिकांना वाऱ्यावर सोडले असल्याची चर्चा रंगली आहे.  

जामनेर तालुक्यातील जनतेला उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी त्यांना जळगाव, औरंगाबाद, नाशिक, मुंबई या सारख्या ठिकाणी जावे लागू नये म्हणून राज्याचे माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री जामनेर तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी मोठा गााजावाजा करून जामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र(GM) हॉस्पिटल उभारले.  परंतु,  ज्यांनी राज्यभर आरोग्य कॅम्प घेऊन रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा पुरविल्या व राज्यभर आरोग्य दूत म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली.  त्यासाठी जामनेरात  हॉस्पीटलची मुहूर्तमेढ रोवली.  त्यांनी कोरोना महामारीच्या काळात तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले असून एकच वर्षांत येथील  GM हॉस्पिटल जळगाव येथील गोल्ड सिटी हॉस्पीटलला चालवायला दिलं आहे.  या हॉस्पीटलमध्ये रुग्णांना  उपचार व सुविधा देतांना  खुप जास्त म्हणजे अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहे. याकडे आमदार गिरीश महाजन यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.  कारण येथे सेवा कमी व धंदाच जास्त केला जात आहे. कोरोना कोरोना महामारीच्या काळात GM हॉस्पिटलचा जनतेला कुठलाही लाभ मिळत नाही. आजच्या महामारीच्या काळात आरोग्य सेवेसाठी झटणारे आरोग्यदूत स्वतःच्या तालुक्यात स्वतः उभारलेले  हॉस्पिटल एक  वर्षही चालवू शकले नाही कारण या हॉस्पिटलमध्ये गरीब कोरोना रुग्णांना मोफत किंवा स्वस्त इलाज करण्याची मागणी झाली असती. ते हॉस्पिटल चालवितांना परवडणारे नव्हते म्हणून हॉस्पिटल खाजगी डॉक्टरांना चालवायला दिले असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

 

Protected Content