जि. प.सदस्य पल्लवी सावकारे यांच्या तक्रारीनंतर ग्रामसेविकेची बदली

 

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील किन्ही येथील ग्रामसेविकेने बदली रद्द करण्यासाठी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करावी, अशी मागणी जि. प. सदस्य पल्लवी सावकारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्याकडे केली होती. यात त्या ग्रामसेविकेला आरोग्य विषयक कोणत्याही प्रकारची समस्या नसल्याचा अर्थात रिपोर्ट नील आल्याने तिची प्रशासनाने बदली केली आहे.

जि. प. सदस्य पल्लवी सावकारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना निवेदन देऊन किन्ही येथील ग्रामसेविका प्रियांका अशोक बाविस्कर यांच्याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी ग्रामसेविकेने हृदयासंबंधी आणि पक्षाघाताचा त्रास असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्रानुसार बदली थांबवण्यात आली आहे. तथापि, संबंधीत ग्रामसेविकेने सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करीत वैद्यकीय तपासणीची मागणी केली होता. त्यानुसार पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता संबंधित ग्रामसेविकेला आरोग्य विषयक कोणत्याही प्रकारची समस्या नसल्याचा अर्थात रिपोर्ट नील असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सकांनी दुसरा रिपोर्ट दिला आहे. हा रिपोर्ट नील आल्याने त्या ग्रामसेविका प्रियांका अशोक बाविस्कर यांची बदली यावल तालुक्यातील चुंचाळे  येथे करण्यात आली आहे.

Protected Content