जिल्ह्यात ३१ मेपर्यंत कलम १४४ कलम लागू

 

जळगाव,प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी १४४ कलम लागू केले असून अनावश्याकरित्या फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यतील नागरिकांना १४४ कलम लागू करण्यात आल्याने अनावश्याकरित्या फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याकाळात सभा, सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजानाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा व सर्व आठवडे बाजार भरवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. शिवाय सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक, ५ वर्षाखालील बालके, गर्भवती महिला, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती यांनी घरीच राहावे. परंतु, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा घेण्यासाठी यांना मुभा देण्यात आलेली आहे. तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या नियमांचे जिल्ह्यातील नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content