Home आरोग्य जिल्ह्यात धरणगावला आज सर्वाधीक रूग्ण : शहरात १८ तर ग्रामीण भागात ४...

जिल्ह्यात धरणगावला आज सर्वाधीक रूग्ण : शहरात १८ तर ग्रामीण भागात ४ बाधीत

0
30

धरणगाव प्रतिनिधी । आज तालुक्यात २२ रूग्ण आढळून आले असून यात शहरातील १८ तर चार गावांमधील प्रत्येकी एक रूग्ण असल्याची सुधारित माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, आज जळगाव जिल्ह्यातील सर्वाधीक २२ रूग्ण हे धरणगाव तालुक्यातील आहेत. यातील १८ रूग्ण हे धरणगाव शहरातील असून उर्वरित चार रूग्ण हे जांभोरे, वराड, बोरखेडा आणि बांभोरी बुद्रुक या गावांमधील आहेत. धरणगाव शहरातील रूग्ण हे घोडे गल्ली, संजय नगर, मराठे गल्ली, वाणी गल्ली, खत्री गल्ली परिसरातील आहेत. दरम्यान रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे. शहरातील चिंतामणी मोरया परिसरातील १० जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी ही सुधारित माहिती लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली आहे.


Protected Content

Play sound