जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य निवडणूक आयोगाने आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली असून यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचाही समावेश आहे.
राज्य सरकारने राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. सरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार या सर्व ग्रामपंचायतींमध्ये लोकनियुक्त सरपंच निवडून जाणार आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्ती युपीएस मदान यांनी या अनुषंगाने आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
१८ ऑगस्ट २०२२ – निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल
२४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ – नामनिर्देशपत्रे दाखल करण्याचा कालावधी
२ सप्टेंबर २०२२ – उमेदवारी अर्जांची छाननी
६ सप्टेंबर २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) – अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
१८ सप्टेंबर २०२२ – मतदान (स. ७.३० ते सायं. ५.३०)
१९ सप्टेंबर २०२२ – मतमोजणी होईल
जिल्ह्यात १३ लोकनियुक्त सरपंचांची होणार निवड
दरम्यान, आज जाहीर झालेल्या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात यावल तालुक्यातील मालोद आणि परसाडे ग्रामपंचायतीत निवडणूक होणार आहे. यासोबत चोपडा तालुक्यातील पिंपरी, बोरअजंटी, देव्हारी, कर्जाणे, मेलाणे, मोहरद, सत्रासेन, उमर्टी, वैजापूर, कृष्णापूर आणि मोरचिडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.