जळगाव प्रतिनिधी । जळगाव कोवीड रूग्णालयाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात ३८ रूग्ण आढळून आले आहे. तर दुसरीकडे ४० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यातील चार तालुके निरंक असून रूग्ण संख्या ५४ हजाराच्या उंबरठ्यावर आला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर- १२, जळगाव ग्रामीण- २, भुसावळ-६, अमळनेर-१, चोपडा-३, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-६, पारोळा-०, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-१, बोदवड-० आणि अन्य जिल्हा – ० असे एकुण ३८ रूग्ण आज आढळून आली आहेत.
प्रशासनाने आज दिलेल्या आकडेवारीनुसार एकुण ५३ हजार ९८९ रूग्ण संख्या झाली आहे. त्यापैकी ५२ हजार ३३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३७३ रूग्ण कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज ४० रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.