जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयान आज पाठविलेल्या कोराना अहवालात जिल्ह्यात एकुण ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-२०, जळगाव -२, भुसावळ-२, अमळनेर-०, चोपडा-१, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकण ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ५०१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ७५३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३८१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण यांनी दिली आहे.