जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून ३२ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. आज आठ तालुके निरंक असल्याचे दिसून आले असून ४५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर भुसावळ आणि चोपडा तालुक्यातील प्रत्येकी एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-१३, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-३, अमळनेर-०, चोपडा-१, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-०, रावेर-४, पारोळा-५, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर आणि बोदवड -० असे एकुण ३२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आज आढळून आलेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५६ हजार ९१५ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ५५ हजार १७३ रूग्णांचा कोरोनामुक्त झाले आहे. तर ३८८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज भुसावळ आणि चोपडा तालुक्यात प्रत्येकी एक असे दोन रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी.पाटील यांनी दिली.