जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून कोवीड रूग्णांची आकडेवारी आज सायंकाळी प्राप्त झाली आहे. यात जिल्ह्यात आज १४० कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत तर ४८६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर -४७, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३७, अमळनेर-४, चोपडा-८, पाचोरा-२, भडगाव-२, धरणगाव-१, यावल-३, एरंडोल-२, जामनेर-८, रावेर-५, पारोळा-४, चाळीसगाव-१०, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ आणि अन्य जिल्हा ३ असे एकुण १४० रूग्ण आज आढळून आले आहे.
तालुकानिहाय आडेवारी
जळगाव शहर -११,५०१, जळगाव ग्रामीण-२४५७, भुसावळ-३६०९, अमळनेर-४२४८, चोपडा-४२४२, पाचोरा-१८७६, भडगाव-१८३०, धरणगाव-२१४५, यावल-१६५६, एरंडोल-२७८२, जामनेर-३८५७, रावेर-२०८१, पारोळा-२४४३, चाळीसगाव-३३५९, मुक्ताईनगर-१६३६, बोदवड-७९६ आणि अन्य जिल्हा ४०८ असे आज एकुण ५० हजार ९२६ रूग्ण झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ९१.७३ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण ५० हजार ९२६ रूग्ण आढळून आले असून ४६ हजार ७१५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज २ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात १२२१ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता २ हजार ९९० रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.