जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतीच्या मतदानाची तारीख जाहीर

 

जळगाव, प्रतिनिधी। जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे

जिल्ह्यातील ११५३ ग्रामपंचायतीपैकी एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालवधीत मुदत संपणाऱ्या ७८३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोग यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार दि. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजीच्या आदेश या जिल्ह्यामध्ये ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका असणाऱ्या जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून ते निवडणूक निकाल जाहीर होई पर्यंत आचारसंहिता लागू करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे आवाहन केले आहे.

Protected Content