पाचोरा प्रतिनिधी । भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव ही प्रतिज्ञा आपण शाळेत असताना म्हटली. असे असतांना आजची स्त्री चूल आणि मूल सांभाळून देशसेवेचे कार्य करण्यासाठी सरसावली असून ‘जय जवान, जय किसा’ न हा नारा सार्थ ठरवत जिल्ह्यातील गोंडगाव, वाघळी, वडगावआंबे व नाचणखेडा येथील चौघ्या शेतकरी कन्यांची स्टाँफ सिलेक्शन कमीशन मार्फत २०१८-१९ मधे घेण्यात आलेल्या लेखी व मैदानी चाचणीतुन वेगवेगळ्या फोर्समधे निवड झाली आहे.
मैदानी चाचणीसाठी सराव म्हणुन अक्षरश गावरस्त्यावर धावणा-या या तरुणींनी देशसेवेसाठी घेतलेली धाव ही आभिमानास्पद अशीच आहे. कर्तव्यापुर्ती आकाश ठेगंणे या उक्तीनुसार स्री ही कोणत्याच क्षेत्रात मागे नसल्यात तरी सैन्यात खांद्याला खांदा लावुन लढण्यासाठी सज्ज झालेल्या या खानदेशकन्या पहिल्यावहिल्या म्हणुन उल्लेखनीय ठराव्यात गोंडगाव, ता. भडगाव येथील लक्ष्मी धनराज चौधरी ह्या एम काँम झालेल्या तरुणीची आसाम रायफल मधे निवड झाली आहे.आपल्या भावाचे सैन्यात जाण्याचे स्वप्न होते. पण अद्याप यश न आल्याने, मी निश्चयपुर्वक हे क्षेत्र निवडाले.पुढे कमांडो होण्याचे तीचे स्वप्न आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील हर्षाली संजय चौधरी ही टीवायबीए ला आहे. तीची बीएसएफमध्ये निवड झाली आहे. वडील शेतकरी, कुंटुंबात तीच मोठी होती. हातभार लागावा म्हणुन दुसरा पर्याय नसल्याने पोलिसात जायचं होते. परंतु स्टाफ सिलेक्शनची माहीती मिळाली अन् यश मीळाले. लक्ष्मी व हर्षाली दोघींनी चाळीसगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील पुजा अशोक पाटील ह्या बी. कॉम झालेल्या तरुणीची सीआयएसएफ मधे निवड झाली आहे.खरेतर एमपीएससी तयारी सुरु होती. भाऊ आर्मीत कमांडो. त्याची प्रेरणा होतीच. लहानपणापासून तीला फोर्समधे जाण्याची आवड शिवाय जाँब करायची इच्छा होती.संधी चालुन आली. पुढे याच फोर्समधे उच्च पदावर जाण्याची तीची जिद्द आहे.
जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील शुभांगी सुनील पाटील ही शेदुर्णी येथील गरुड महाविद्यालयातुन बीएससी झाली.काका आयटीबिपी मधे आजोबा पीएसआय. त्यांची प्रेरणा होती. यामुळे वर्दीचे आकर्षण होतेच. लहानपणी आर्मीत जाण्याचे स्वप्न होते.कशालाच घाबरत नाही.पहील्याच भरतीत एसएसबी मिळाले.
देशसेवेसाठी सज्ज झालेल्या या चौघींचे वैशिष्ट्ये म्हणजे त्या खेड्यातील शेतकरी कन्या आहेत. त्यांनी एकटीनेच सराव केला.कोणताही स्पर्धा परीक्षा क्लास नाही. भल्या पहाटे उठत गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर त्यांनी धावण्याचा सराव करत देशसेवेसाठी देशप्रेमाची धाव घेतली आहे. काही तरी करण्याची उर्मी बाळगुन असणाऱ्या तमाम तरुंणीसाठी त्या आदर्श ठराव्यात.
चूल आणि मूल यांना फाटा
आजची स्त्री फक्त संसार सुखाचा करून चूल आणि मूल एवढेच आपले काम नसल्याचे दाखवत विविध ठिकाणी स्त्री आज काम करताना दिसून येत आहे. चूल आणि मूल बरोबर देशसेवा हे देखील आपले एक कर्तव्य असल्याचे या लक्ष्मी, हर्षाली, शुभांगी व पुजा या चारही नवतरुणींनी दाखवून दिले आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/423658738725344