जिल्ह्यातील कर्तुत्ववान महिलांचा जिल्हा परिषदेतर्फे सन्मान
*जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी |* – जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा जिल्हा परिषद अध्यक्षाच्या हस्ते महिला बाल विकास विभागातर्फे आज सन्मान करण्यात आला.
जिल्हातील विविध क्षेत्रात सामाजिक राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, शासकीय सेवेत विशेष योगदान देणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागार्फे जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्या हस्ते या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ना. रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योती पाटील, देवेंद्र राऊत, जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन आदी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, सन्मानार्थी महिला उपस्थित होत्या.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/489095609376765