जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । एचएससी अर्थात बारावीचा निकाला बुधवारी दुपारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्याचा ९५.४६ टक्के निकाल लागला असून परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.
माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक एचएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल दुपारी जाहीर करण्यात आला. आज दुपारी जाहीर झालेल्या निकालानुसार, जळगाव जिल्ह्याचा ९५.५२ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातील शास्त्र विभागाचा निकाल सर्वोच्च लागला असून शास्त्र शाखेचा निकाल ९९.०७, वाणिज्य ९६.९३, कला ९२.२९ तर एमसीव्हीसी ९३.८० टक्के निकाल लागला असून निकालात मुलींनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा बाजी मारली आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.