जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रसंगी मंचावर प्रशासकीय अधिकारी डॉ.यु.बी.तासखेडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.वैभव सोनार, निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. विलास जयकर, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.इम्रान पठाण, सेविका कविता नेतकर, प्राचार्य विद्या राजपूत, मौखिक अधिकारी संपदा गोस्वामी, डॉ.बाळासाहेब सुरोशे, अधिसेविका कविता नेतकर आदी उपस्थित होते. यावेळी अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कर्करोग निवरणा विषयी त्यांच्या मनोगतात माहिती दिली. प्रसंगी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम तीन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज मोहम्मद शिकलगार या पानटपरी चालक कॅन्सर मुक्त झाल्याबद्दल त्याचा मान्यवराच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
https://www.facebook.com/508992935887325/videos/416845582907618