जळगाव, प्रतिनिधी । शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी निरामय सेवा संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, जी.एम.फाऊंडेशनकडून ५०० पीपीई किट सुपूर्द केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा बजावणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५० पीपीई किट्स देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य योगेश्वर गर्गे, विभाग प्रचारक निलेश गद्रे, दीपकराव घाणेकर, महापौर भारती सोनवणे, आ.राजुमामा भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, विनोद कोळी, संदीप कासार, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ.रितेश पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी, नंदू शुक्ल, मंगल परदेशी, माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख, मनोज भांडारकर कवी कासार आदी उपस्थित होते.