Home Cities जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमधील बेबनाव निरीक्षकांसमोर उघड

जिल्हा राष्ट्रवादीमधील बेबनाव निरीक्षकांसमोर उघड

0
32

 

 

जळगाव : प्रतिनिधी । शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीमधील बेबनावाचा आज पक्ष निरीक्षकांसमोर आढावा बैठकीत जाहीर पंचनामा झाल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे

 

राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अविनाश आदिक आज संघटनात्मक कामांचा आढावा घेण्याच्या बैठकीसाठी जळगावात आले आहेत राष्ट्रवादी  काँग्रेसच्या शहर – जिल्हा कार्यालयात ही बैठक सुरु आहे या बैठकीत पक्ष निरीक्षक अविनाश आदिक यांच्यासमोर  महानगर सर चिटणीस सुशील शिंदे  यांनी पक्षातील बेबनाव आणि गटबाजीच्या तक्रारींचा पाढा वाचला पदाधिकारी आणि नेत्यांमध्येच समन्वय नाही असा त्यांचा मुख्य मुद्दा होता गटबाजीमुळेच आज बॅनरवर माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर , जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांची छायाचित्रे नाहीत असा आक्षेप त्यांनी नोंदवला होता

 

सर्व महानगर फ्रंटलचे कार्यकारणी सदस्य तसेच सर्व सेलचे कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते  यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते

 


Protected Content

Play sound