जिल्हा बँक निवडणुकीसाठी पालकमंत्र्यांचे मतदान

धरणगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदान केले.

 

आज सकाळी 8 वाजेपासून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतसाठी मतदान सुरू झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील 15 केंद्रांवर सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. सकाळपासून विविध मान्यवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात धरणगाव येथील केंद्रावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला दणदणीत बहुमत मिळेल, असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Protected Content