जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिनाच्या निमित्ताने सोमवार 1 मे रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात आज शासकीय कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आपण पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, सायबर क्राईम चे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील विविध विभागात कार्यरत असलेल्या उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या यशस्वी पोलीस कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याहस्ते सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.