जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बळीराम पेठेतील जिल्हा पत्रकार भवनात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कॅमेरा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आमदार राजूमामा भोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, प्रेस फोटोग्राफर व पत्रकार यांचे जीवन धावपळीचे आहे. शहरात होणाऱ्या घडामोडीच्या वृत्तांकन व फोटो टिपण्याचे काम करतात त्यामुळे प्रत्येक फोटोग्राफर आणि पत्रकार यांनी केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेतून विमा काढून घेणे गरजेचे आहे. तसेच मेहरूण तलावाजवळ फोटाग्राफर व पत्रकारांसाठी शासनाच्या निधीच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून वास्तू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. यासाठी १० ते १२ लाखांचे इस्टेमेट तयार करून शासनाला पाठविणार असल्याचे आश्वासन आमदार भोळे यांनी दिले. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी शाम लोही यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, आरटीओ विभागाचे अधिकारी शाम लोही, ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर पांडूरंग महाले, जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त जमनादास भाटीया, प्रोटोग्राफर हेमंत पाटील, अभिजित पाटील, संधीपाल वानखेडे, आबा मकासरे, शैलेंद्र सोनवणे, सचिन पाटील, भुषण हंसकर, भगवान सोनार, निखील सोनार, अरूण इंगळे, रजनिकांत पाटील, गोकुळ सोनार, प्रकाश लिंगायत, सुमित देशमुख, रोशन पवार, योगेश चौधरी, संदीप होले, राहूल शिरसाळे यांच्यासह प्रेस फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/742514986972886