जळगाव प्रतिनिधी । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हा व सत्र न्यायालयात मराठी पंधरवाड्या निमित्त ‘मराठी भाषेचा वापर’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी कवयित्री बहिणाबाई विद्यापीठातील मराठी भाषा अभ्यास मंडळाचे संजीवकुमार सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश जी.ए.सानप, न्या. पी.वाय.लाडेकर, जिल्हा वकील संघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीप बोरसे, सचिव ॲड. दर्शन देशमुख, जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके आदींची उपस्थिती होती. आभार के.एच. ठोंबरे यांनी केले.