यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा दुध संघात निवडून आलेला हा स्व.माजी खासदार हरीभाऊ जावळे यांना समर्पित करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामवीकास मत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनात या संपुर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी असलेल्या अमोल हरिभाऊ जावळे व सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रत्येक मताचे नियोजन केले. वेळोवेळी शांतपणे संवाद, समन्वयाची भूमिका बजावली. प्रचारा वेळी सामाजिक दडपण झुगारून स्व. हरिभाऊ जावळे यांच्याप्रमाणे पक्षहिताला प्राधान्य दिले व अखेर विजयश्री खेचुन आणली हा विजय पदाधिकारी यांनी स्व. हरिभाऊ जावळे यांना समर्पित केले.
वारिष्ठांच्या या अचूक मार्गदर्शन आणी नियोजनामुळे यावल-रावेर या विधानसभा क्षेत्रात भाजप- बाळासाहेब शिवसेनेच्या शेतकरी पॅनलच्या झालेल्या दणदणीत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, व एकदिलाने काम केले,एक-एक मत जोडले व त्याची फलश्रुती म्हणुन जिल्ह्यात एकमेव फैजपुर बुथ वर सर्व १९ उमेदवारांना मताधिक्य मिळाले.
-सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्तेतील कोणतेही महत्त्वाचे पदे व संघटनात्मक जबाबदारी दिलेली नसताना अमोल हरिभाऊ जावळे यांनी सर्वांना सोबत घेऊन स्वत:चे नेतृत्वगुण सिद्ध केले. स्व.हरिभाऊ जावळे यांच्या पश्चात भाजपमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने सोपवलेली जबाबदारी फत्ते केली. दूध संघाच्या निमित्ताने उदयोन्मुख नेतृत्वगुणाची ही चुणूक लक्षवेधी ठरली.
यावेळी जळगाव जिल्हा दुध संघात शेतकरी पॅनल व्दारा मिळवलेल्या लक्ष वेधुन घेणाऱ्या विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले . यावेळी विजयी उमेदवार ठकसेन पाटील व नितिन चौधरी यांचे स्वागत करण्यात आले. भालोद तालुका यावल येथे कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अमोल जावळे, हिरालाल चौधरी, राकेश फेगडे, हर्षल पाटील, नारायण चौधरी, पिन्टू राणे, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, अतुल पाटील, व्यंकटेश बारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.